ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसागर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्यादरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाचशोधात असावी.. बराच वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळयेऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलचीकाळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्यादरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला..लगेचकाहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला..मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो ऐकूआलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पणमात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण..शांतराहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर नाहीयेना..!
खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिचीवाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेनमधला प्रवास..! गर्दीतून... त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अनत्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्याबंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धाएकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य नव्हतं..घडू नयेतसचं घडलं..
एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा.... बायकांच्या किंकाळ्या..माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरणभयानक.. "कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली " अश्या हाका. ट्रेनमधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण ... ट्रेनथांबण्या आधीच ..सार संपलं होतं... तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पायघसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरातअडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं..त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सारनिःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले...या परिस्थितीत काय करावं..त्यालाकाहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्यागोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलंहोतं…नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला …. मगाशीचआल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षणआठवायला लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावरत्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाटधरली होती... आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फारजवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .
आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ चीCST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोजशोधत राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनीनिस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..
आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजीकरणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात कायघडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच नशिबीअसतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा..अनआजपासून..जपून प्रवास करा..





Fortunately we enjoyed so many different climate changes on the Fort. At one instant it was so cloudy and foggy that we could hardly see 20m distance. The next moment it was sunny and clouds cleared so fast, the next moment is started raining. Strong wind made splashes of rain on our tired faces. Instant refresher that it was, we enjoyed it for some time and started our way down.